लांजा: लांजा तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे माजी प्रशासकीय अधिकारी व लांजा गावचे सुपुत्र गौतम कांबळे यांना नुकतेच कोल्हापूर येथे आधार स्पेशल फाऊंडेशन बेळगाव- कर्नाटक- महाराष्ट्र गोवा यांच्यावतीने नॅशनल एक्सलंट गोल्ड स्टार अवॉर्ड २०२५ या प्रतिष्ठेच्या आदर्श समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
गौतम कांबळे यांना यापूर्वी आत्मश्री कॅनडा संस्कृती प्रतिष्ठान बेंगलोर यांच्यावतीने इंटरनॅशनल सोशियल वर्क गोल्ड स्टार, विजयालक्ष्मी सोशल फाउंडेशन सोलापूरचा राष्ट्रीय समाजभूषण गौरव पुरस्कार, आशिया इंटरनॅशनल कल्चरल रिसर्च विनर सिटी बेंगलोर यांच्याकडून म्हैसूर तामिळनाडू येथे हॉनरी डॉक्टरेट अवॉर्ड ने गौरविण्यात आले असून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर अनेक पुरस्कार व गौरव त्यांना प्राप्त झाले आहेत. प्रशासकीय सेवा करत असतानाच फक्त प्रशासकीय चाकोरीत न राहता समाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध स्तरावर काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य व राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारानी गौरव झाला आहे. लांजा तालुक्याचे सुपुत्र असलेले गौतम कांबळे हे लांजा तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आणि सहकार क्षेत्रात सक्रीय आहेत. जिल्हा सहकार खाते कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, संस्कृती फाऊंडेशन लांजा- रत्नागिरी अध्यक्ष, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सहकार खाते कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या चे अध्यक्ष, राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, शाखा रत्नागिरी चे उपाध्यक्ष, शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समिती चे उपाध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी, केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्ड मुंबई सदस्य, लांजा तालुका माजी विद्यार्थी संघ सल्लागार म्हणून कार्यरत असून अशा विविधांगी पैलूमधून गौतम कांबळे यांची कार्यकुशलतेची विविधता ठळक दिसून आली आहे. नुकताच त्यांना स्पेशल फाऊंडेशन बेळगाव- कर्नाटक- महाराष्ट्र गोवा यांच्यावतीने नॅशनल एक्सलंट गोल्ड स्टार अवॉर्ड २०२५ या प्रतिष्ठेच्या आदर्श समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त गौतम कांबळे यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.