GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : ओरी मार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

Gramin Varta
577 Views

रत्नागिरी : ओरी परिसरातील रस्त्यावर शनिवारी सायंकाळी अचानक झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जखमी झाले. सायंकाळी साधारण सातच्या सुमारास हा प्रकार घडला. अंकुश छोटू पाटकर आणि संदेश धोंडू घाणेकर (दोघेही आगवे-घाणेकरवाडी) अशी जखमींची नावे समजली आहेत.

अंकुश पाटकर आपल्या दुचाकीवरून संदेशला घेऊन ओरीकडून आगवेच्या दिशेने जात असताना एका अवजड ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी अचानक होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. धडक देताच ट्रक चालकाने थांबण्याचाही प्रयत्न न करता तिथून थेट पसार होणे अधिकच गंभीर ठरले.

या घटनेबाबत महेश मनोहर गोताड यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पळणाऱ्या चालकाचा शोध सुरू आहे.

Total Visitor Counter

3370350
Share This Article