GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : साठरेबांबर येथे गावठी दारू जप्त, महिलेवर गुन्हा

Gramin Varta
126 Views

रत्नागिरी: ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साटरे बांबर बौद्धवाडी परिसरात बुधवारी (२६ नोव्हेंबर २०२५) सायंकाळी दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नथुराम सावंत यांच्या जुन्या घराजवळील पायवाटेवर ही कारवाई करण्यात आली असून, आरोपी महिलेकडून ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार (मपोहवा/१२७४) तृप्ती रविकांत सावंतदेसाई यांनी फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी साटरे बांबर बौद्धवाडी येथील नथुराम सावंत यांच्या जुन्या घराजवळील पायवाटेवर छापा टाकला. त्यावेळी शारदा सुभाष पवार (वय ५७, रा. साटरे बांबर, बौद्धवाडी, ता. जि. रत्नागिरी) या महिलेच्या ताब्यात गैरकायदा, बिगर परवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले.

या छाप्यात पोलिसांनी शारदा पवार यांच्या ताब्यातून ८०० रुपये किमतीची एकूण ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. आरोपी महिलेने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ही दारू अवैधपणे आपल्या ताब्यात बाळगल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शारदा पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Total Visitor Counter

3388211
Share This Article