GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : घरगुती वादातून विवाहितेला मारहाण; पूर्व पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
282 Views

चिपळूण: कौटुंबिक वादातून घटस्फोटाचा दावा सुरू असताना आशासेविका असलेल्या एका महिलेस तिच्या पूर्व पतीने व सासरच्या व्यक्तींनी एकत्र येऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वैभव पांडुरंग तांबट, विनोद पांडुरंग तांबट, विशाखा विनोद तांबट, रोहिणी रविंद्र पंडव आणि श्रद्धा गणेश गांजेकर अशा एकूण पाच आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती पत्नीमध्ये कौटुंबिक कारणांमुळे दोघांमध्ये सतत वाद होऊन मतभेद झाले. यामुळे गेल्या दोघांनी खेड कोर्टात घटस्फोट मिळवण्यासाठी दावा दाखल केला आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास महिला मिटींगसाठी जात असताना त्यांना एका रिक्षातून त्यांचे पूर्व पती एका महिलेसोबत जाताना दिसले. त्यांना पाहून त्यांनी त्यांच्या प्लेझर दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत पतीला यांच्या राहत्या घराचे अंगणात गाठले.

या ठिकाणी दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादादरम्यान पतीने शिवीगाळ करत दमदाटी केली आणि हाताचे थापडाने मारहाण करून ढकलून दिले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या विनोद पांडुरंग तांबट यांना बोलावून घेतले. विनोद तांबट यांनी आपल्या हातातील काठीने महिलेच्या उजव्या मांडीवर मारहाण करत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता विशाखा विनोद तांबट यांनी हाताचे ठोशाने पाठीवर मारले, तर दुसऱ्या एका महिलेने दोन्ही हात पिरगळले. तसेच, तिसऱ्या महिलेने धक्काबुक्की करत पीडित महिलेला घराच्या अंगणाबाहेर काढले.

या संपूर्ण मारहाणी आणि धक्काबुक्कीच्या घटनेनंतर महिलेने यांनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेची नोंद घेत पोलिसांनी दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा २२.३५ वाजता (१० वाजून ३५ मिनिटांनी) पाचही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्यानुसार गु.र.क्र. ८३/२०२५ अन्वये कलम १८९(२), १९०, ११५(२), ११८(२), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3377197
Share This Article