GRAMIN SEARCH BANNER

देवरुख: मारळ फाटा परिसरात झाडीझुडपात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

Gramin Varta
461 Views
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील मारळ फाटा ते कळकदरा जाणाऱ्या मार्गावरील झाडीझुडपात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून, संबंधित व्यक्ती आंगवली येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. मारळ गावचे पोलीस पाटील देवदास चंद्रकांत सावंत यांना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मारळ फाटा परिसरातून उग्र कुजकट वास येत असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गवताळ भागात एका पुरुषाचे प्रेत अत्यंत विदारक स्थितीत आढळून आले. या मृतदेहाचे डोक्यापासून पायाच्या पंजापर्यंतचे पूर्ण शरीर कुजलेले होते. मृताच्या अंगात राखाडी रंगाची पँट, काळपट टी-शर्ट, डोक्यावर लाल टोपी आणि जवळच एक टॉवेल मिळून आला. पोलिसांनी या घटनेची तात्काळ नोंद घेत तपास केला असता, सदर मृत व्यक्ती ही आंगवली भगतवाडी येथील संतोष राजाराम अणेराव (वय ५२) असल्याचे समोर आले आहे.

ही घटना १९ मार्च २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, देवरूख पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून संतोष अणेराव यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Total Visitor Counter

3366907
Share This Article