GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रतीक साळवी

देवरुख (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक अध्यक्षपदी पाटगाव येथील प्रतीक सुनील साळवी यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतीक साळवी हे कुंभार समाजाचे विभागीय अध्यक्ष असून धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. ते आमदार शेखर निकम यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी तालुक्यात चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे. मितभाषी स्वभाव आणि अडीअडचणीच्या वेळी मदतीसाठी तत्पर धावून जाणे ही त्यांची वैशिष्ट्ये मानली जातात.

संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साळवी यांची युवक तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस अजिंक्य आंब्रे, जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे, शहराध्यक्ष हनीफभाई हरचिरकर, संघटक बाळू ढवळे, मावळते युवक तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर, उपसभापती प्रफुल्ल बाईत, पंचायत समिती सदस्य मंगेश बंडागळे, आरुषी घवाळी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांनी, देवरुख शहरासह तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये बूथ कमिट्या मजबूत करून पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

दरम्यान, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुक्यातील युवकांना एकत्र आणत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतीक साळवी यांनी सांगितले. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

साळवी यांच्या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, तालुका संपर्क प्रमुख तुकाराम मेस्त्री, महिला तालुका अध्यक्ष मानसी करंबेळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख उमेश महाडिक, उपसभापती प्रफुल्ल बाईत, जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, आरुषी घवाळी, बंधू सुर्वे, नगरसेवक यशवंत गोपाळ, दीपक खेडेकर, माजी उपसरपंच अमित जाधव आदींनी अभिनंदन केले.

Total Visitor Counter

3472887
Share This Article