GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण पालिका निवडणुकीसाठी मतदान जनजागृती सुरू

Gramin Varta
68 Views

चिपळूण : नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या २ डिसेंबर रोजी होत असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका क्षेत्रात मतदान जनजागृतीचा प्रारंभ करण्यात आला.

चिपळूणचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि चिपळूण पालिकेचे प्रशासक विशाल भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर करण्यात आला.

या कार्यक्रमास उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी स्थानिक कलाकारांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करत नागरिकांना २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

प्रांताधिकारी आकाश लिगाडे व मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी मतदानाचे महत्त्व, मतदारांची जबाबदारी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत आवश्यक असल्याचे सांगत जनतेला शंभर टक्के मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

Total Visitor Counter

3366997
Share This Article