मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी ५/६.१२.२०२५ (शुक्रवार – शनिवार)च्या मध्यरात्री परळ- कल्याण आणि कुर्ला – वाशी/पनवेल दरम्यान १२ अतिरिक्त उपनगरी विशेष लोकल सेवा चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
या उपनगरी विशेष लोकल ट्रेन सर्व स्थानकांवर थांबा देतील.
सर्व संबंधितांनी याची कृपया नोंद घ्यावी व या सुविधेचा लाभ घ्यावा. प्रवाशांना गैरसोयी टाळण्यासाठी योग्य व वैध तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासन करीत आहे. तपशील पुढीलप्रमाणे…
मुख्य मार्ग – अप विशेष गाड्या (कल्याण/ठाणे/कुर्ला- परळ मार्ग)
– कुर्ला – परळ ही विशेष गाडी कुर्ला येथून ००.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे ०१.०५ वाजता पोहोचेल.
– कल्याण – परळ ही विशेष गाडी कल्याण येथून ०१.०० वाजता सुटेल आणि परळ येथे ०२.२० वाजता पोहोचेल.
– ठाणे – परळ ही विशेष गाडी ठाणे येथून ०२.१० वाजता सुटेल आणि परळ येथे ०२.५५ वाजता पोहोचेल.
मुख्य मार्ग – डाउन विशेष गाड्या (परळ – कुर्ला/ठाणे/कल्याण मार्ग)
– परळ – ठाणे/कल्याण ही विशेष गाडी परळ येथून ०१.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०१.५५ वाजता पोहोचेल.
– परळ – कल्याण ही विशेष गाडी परळ येथून ०२.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.५० वाजता पोहोचेल.
– परळ – कुर्ला ही विशेष गाडी परळ येथून ०३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.२० वाजता पोहोचेल.
हार्बर मार्ग – अप विशेष गाड्या (पनवेल/वाशी – कुर्ला मार्ग)
– वाशी – कुर्ला ही विशेष गाडी वाशी येथून ०१.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचेल.
– पनवेल – कुर्ला ही विशेष गाडी पनवेल येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.४५ वाजता पोहोचेल.
– वाशी – कुर्ला ही विशेष गाडी वाशी येथून ०३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.४० वाजता पोहोचेल.
हार्बर मार्ग – डाउन विशेष गाड्या (कुर्ला- वाशी/पनवेल मार्ग)
– कुर्ला – वाशी ही विशेष गाडी कुर्ला येथून ०२.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
– कुर्ला – पनवेल ही विशेष गाडी कुर्ला येथून ०३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०० वाजता पोहोचेल.
– कुर्ला – वाशी ही विशेष गाडी कुर्ला येथून ०४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०४.३५ वाजता पोहोचेल.







