GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: केळवली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनेश जैतापकर यांचा शिंदे गटाला रामराम; शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

Gramin Varta
142 Views

राजापूर : काही काळ शिवसेना शिंदे गटात राहिलेले केळवली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनेश जैतापकर यांनी शिंदे गटाची साथ सोडून आपल्या कार्यकर्त्यांसह बुधवारी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.या सर्वांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले.

राजापूर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दिनेश जैतापकर यांचे भरीव योगदान आहे. गेले काही काळ ते शिवसेना शिंदे गटामध्ये कार्यरत होते. त्यानंतर आता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पूर्वीचा केळवली आणि नवीन नावाने अस्तित्वात आलेल्या जुवाटी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद चांगलीच वाढली आहे.

यावेळी माजी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, आजी जि. प. सदस्य रामचंद्र सरवणकर, नाना गोटम, दिवाकर मयेकर, प्रशांत कदम यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Total Visitor Counter

3072739
Share This Article