GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जेलनाक्यावर तिहेरी अपघात; वाहतूक काही काळ ठप्प

Gramin Varta
386 Views

रत्नागिरी : जेल नाका परिसरात शनिवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास तीन वाहनांचा अनपेक्षित असा तिहेरी अपघात झाला. अचानक झालेल्या या धडकेमुळे परिसरातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पिकअप व्हॅन, कंटेनर आणि एक चारचाकी कार अशी तीन वाहने एकमेकांवर आदळली. जोरदार धडकेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंगरला तर पिकअप व्हॅनलाही मोठे नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक मार्गी लावली. काही मिनिटांत रस्ता पुन्हा सुरळीत करण्यात आला.

Total Visitor Counter

3369319
Share This Article