मुंबई: सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने ग्राहकांच्या जोरदार मागणीमुळे आपला लोकप्रिय 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन पुन्हा सुरू केला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवरून याची घोषणा केली असून, ही ऑफर 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत देशभरातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध राहणार आहे.
1 रुपयात 30 दिवसांचा ‘ट्रू डिजिटल फ्रीडम’
BSNL च्या या आकर्षक ऑफरअंतर्गत नव्या ग्राहकांना फक्त 1 रुपये रिचार्जमध्ये पुढील सुविधा मिळतात :
30 दिवसांची वैधता
दररोज 2GB हाय-स्पीड 4G डेटा
संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग सुविधा
नॅशनल रोमिंग फ्री
दररोज 100 फ्री SMS





