संगमेश्वर/एजाज पटेल :संगमेश्वर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून भक्कम ओळख निर्माण केलेले निलेश श्रीधर कदम यांनी आगामी पंचायत समिती निवडणूक माभळे गणातून कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती न घेता अपक्ष म्हणून लढवण्याचा घेतलेला निर्णय सध्या प्रचंड चर्चेत असून लोकांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
निलेश कदम हे वेळ, प्रसंग न पाहता लोकांच्या अडचणीच्या वेळी सर्वप्रथम धावून जाणारे अवलिया म्हणून ओळखले जातात. एखाद्याला मदत करायची असेल तर दिवस रात्र, पाऊस वारा, पर्व-आपत्ती काहीच अडथळा नसतो ही त्यांची खास कार्यशैली!
सदैव मितभाषी, हसतमुख आणि जमिनीवर पाय ठेवून काम करणारे कदम सर यांचा जनसंपर्क हा त्यांची खरी ताकद मानला जातो. तालुक्यातील कानाकोपऱ्यात त्यांचे नाव परिचित असून, सामान्यांपासून ते विविध समाजघटकांपर्यंत त्यांचा दांडगा संवाद सतत कायम आहे.
बँक ऑफ इंडिया संगमेश्वर शाखेचे विश्वासू “बँक मित्र”
ते बँक ऑफ इंडिया, संगमेश्वर शाखेचे अधिकृत बँक मित्र असून बँकिंग सेवा ग्रामीण भागातील नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे प्रशंसनीय काम ते अनेक वर्षांपासून करत आहेत.
वृद्ध, महिला, शेतकरी आणि दुर्गम भागातील नागरिकांना खाते व्यवहार, सरकारी अनुदाने, आधार लिंकिंग, खाते अद्ययावत करणे अशा अनेक सुविधा सुलभतेने उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
बचत गट ट्रेनर म्हणून त्यांच्या कार्यशैली, शिस्तबद्ध मार्गदर्शन आणि ग्रामीण भागातील महिलांना उभारी देणाऱ्या उपक्रमांमुळे ते विशेष प्रख्यात आहेत.
निलेश कदम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय हा लोकांच्या मनातील आवाज असल्याचे ग्रामस्थ म्हणतात. त्यांच्या प्रामाणिक कार्यशैली व समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे निलेश दादा सारखी व्यक्ती पंचायत समितीच्या सभागृहात गेल्यास स्थानिक प्रश्नांना वेगाने व पारदर्शक पद्धतीने न्याय मिळेल, असा विश्वास मतदारांमध्ये व्यक्त केला जात आहे.
लोकांचा वाढता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता घेतलेल्या निर्णयातून आता माघार नाही. माझ्या कार्यावर लोकांचा असलेला दृढ विश्वास हीच माझी प्रेरणा असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण ताकदीने उभा राहणार आहे, असे निलेश कदम यांनी स्पष्ट केले.
उत्स्फूर्त लोकसमर्थनामुळे निलेश कदम यांचा आगामी पंचायत समिती माभळे गणातून अपक्ष लढण्याचा निर्णय अधिक भक्कम







