थिबा पॅलेस येथे कारच्या धडकेत वृद्ध महिला जखमी

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस रोडवर शनिवारी दुपारी कारची धडक बसून एक वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली. जखमी महिलेला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

राजश्री चंद्रकांत जाधव (वय ६४, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. शनिवारी दुपारी त्या घरातून बाहेर पडून पायी जात असताना पाठीमागून येणाऱ्या कारने (एमएच १४ बीएक्स ३६४२) त्यांना धडक दिली. ही कार एका महिलेच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.

या अपघाताची नोंद रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *