संगमेश्वर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बुद्रुक कार्यक्षेत्रामध्ये ग्रामस्थ्यांच्या लोकसहभाग आणि श्रमदानातून विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये गुरववाडी येथे दोन कच्चे बंधारे बांधण्यात आले, गुरववाडी ते गावदेऊळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली, शिगवण वाडीतील अंतर्गत सर्व रस्ते, पायवाटा, सार्वजनिक ठिकाणे येथे स्वछता करण्यात आली.
शिगवणवाडी ते कानरकोंड रस्त्याची दुरुस्ती करणे आदी कामे पूर्ण करण्यात आली. नागरिकांनी एकजूट करून आज उत्स्फूर्त पणे या वेळी श्रमदान करत या कार्यात सहभाग घेतला.यावेळी आंबेड बुद्रुकचे सरपंच श्री. सुहास मायगडे, उपसरपंच श्री. शोएब भाटकर, ग्रामविकास अधिकारी सौं. गवंडी मॅडम, ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेश आंबेकर, सौ. नुपुरा मुळ्ये, सौ साक्षी शिगवण, गावचे खोत श्री. उन्मेष काका मुळ्ये, गुरववाडी प्रमुख श्री. प्रदीप गुरव, शिगवण वाडी प्रमुख श्री. संजय शिगवण, व मोठ्या संख्येने महिला वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मानसकोंड गावातील ग्रामस्थांनी ग्रामदेवता मंदिर परिसरात श्रमदान आणि स्वछता अभियान करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग घेतला.
यामध्ये फेपडे वाडीचे गावकर श्री. सुमंत फेपडे, श्री. गंगाराम सोमा फेपडे, श्री. सुनील अंनत फेपडे, सदस्य सौं. संचिता संतोष पाचकले, श्री. दिनेश फेपडे, श्री. संजय फेपडे आदी ग्रामस्थ आणि महिला वर्ग उपस्थित होते.







