GRAMIN SEARCH BANNER

गुहागर पालशेतमध्ये अवैध वाळू वाहतूक; वाहन ताब्यात

Gramin Varta
106 Views

गुहागर : पालशेत समुद्रकिनारी सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर महसूल विभागाने बुधवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत अवधूत मनोहर चव्हाण (पालशेत) यांचे वाहन अर्धा ब्रास वाळूसह ताब्यात घेण्यात आले.

गुहागर आणि पालशेत परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याने महसूल विभागाने करडी नजर ठेवली आहे. त्याच दरम्यान बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पालशेत नाक्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. येथील तलाठी एन. एन. पाटील आणि मंडळ अधिकारी पी. व्ही. कानिटकर यांनी संयुक्त कारवाई केली.

गुरुवारी पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे अवैध वाळू उपशाला आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3366943
Share This Article