GRAMIN SEARCH BANNER

खेड : आंजणी रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला

Gramin Varta
251 Views

खेड : कोकण रेल्वे मार्गावरील आंजणी ते आष्टी दरम्यान रेल्वे रुळाजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. विरेंद्र उराव, पिता चरबा उराव (वय २५, रा. झारखंड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सदर तरुण रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3370001
Share This Article