GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम!

Gramin Varta
405 Views

राजापूरमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मन जिंकले

तुषार पाचलकर / राजापूर : रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरा करण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, राजापूर पोलीस स्टेशन व रायपाटण पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत देखील हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उपक्रमांतर्गत, आज (१६ डिसेंबर) पाचल गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष श्री राजन लब्दे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पो. कॉ. रामदास पाटील यांच्या हस्ते लब्दे यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. लब्दे यांचे स्वागत केले.

यावेळी पाचल ग्रामपंचायत सदस्य तथा पाचल प्रशालेचे शिक्षक पालक संघांचे अध्यक्ष श्री विनायक सक्रे,पाचल गावचे पोलीस पाटील महेंद्र जाधव,युवा कार्यकर्ते विहंग खानविलकर,ग्रामस्थ रवी नारकर आणि प्रकाश धावडे उपस्थित होते.पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या या कार्यातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले आहे.

Total Visitor Counter

3388099
Share This Article