GRAMIN SEARCH BANNER

रेल्वे तिकीटात २६ डिसेंबरपासून होणार वाढ

Gramin Varta
20 Views

मुंबई: भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी तिकीटाच्या भाड्यात पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या बदलांमुळे लांब पल्ल्याच्या आणि विशिष्ट श्रेणीच्या रेल्वे भाड्यात वाढ होणार आहे.

तर दुसऱ्या बाजूला कमी अंतर असणाऱ्या आणि उपनगरीय रेल्वे भाड्यात कोणतेही बदल होणार नाही, असेही रेल्वेने सांगितले आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, रेल्वे चालविण्याचा खर्च वाढला असून खर्च आणि महसूल याच्यात ताळमेळ साधण्यासाठी आणि प्रवाशांनाही स्वस्तात प्रवासाची सुविधा मिळावी, या हेतूने ही किंचित दरवाढ करण्यात आली आहे.

छोट्या अंतरासाठी आणि उपनगरीय रेल्वेची दरवाढ नाही

उपनगरीय रेल्वेच्या मासिक पासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच २१५ किमीपर्यंत प्रवासासाठी सामान्य श्रेणीच्या तिकिटांसाठी दरवाढ करण्यात आलेली नाही.

रेल्वेने सांगितले की, रोज प्रवास करणारे प्रवासी आणि कमी उत्पन्न असणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ही दरवाढ करण्यात आलेली नाही.

Total Visitor Counter

3367380
Share This Article