GRAMIN SEARCH BANNER

सैतवडे येथे नेपाळी महिलेच्या एक दिवसाच्या बाळाचा आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
164 Views

रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथे आंबा बागेत काम करणाऱ्या नेपाळी महिलेच्या एक दिवसाच्या बाळाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना ४ डिसेंबर रोजी घडली.

संबंधित ४० वर्षीय महिलेला गरोदरपणादरम्यान पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याने नातेवाईकांनी तिला तातडीने वाटद-खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी करून प्रसूती केली. मात्र जन्मलेल्या मुलीची प्रकृती नाजूक असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3366911
Share This Article