GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडात एसटी बसच्या धडकेत 75 वर्षीय वृद्ध जखमी, चालकाविरोधात गुन्हा

Gramin Varta
73 Views

मंडणगड : तालुक्यातील चिंचाळी बसथांब्याजवळ एसटी बसने दिलेल्या धडकेत 75 वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बस निष्काळजीपणे चालवल्याचा ठपका ठेवत एसटी बसचालकाविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत जखमी झालेले वसंत गंगाराम सोनगरे (75, रा. सडे, मानेवाडी) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत घटनेचा तपशील नमूद केला आहे. त्यानुसार 24 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 3.45 वाजता चिंचाळी बसथांब्याजवळ एसटी बस (क्रमांक एम.एच.20.बी.एल.1715) वेगाने आणि बेदरकारपणे येत असताना त्यांना धडक बसली. या धडकेत सोनगरे यांना गंभीर दुखापत झाली.
या अपघातप्रकरणी संबंधित बसचालक बाप्पासाहेब नारायण खराटे (36, रा. भिंगळोली) यांच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3366911
Share This Article