GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : कोंडये हायस्कूलच्या मॉडेलची राज्यस्तरावर निवड

Gramin Varta
220 Views

राजापूर : तालुक्यातील कोंडये येथील निर्मला भिडे जनता विद्यालयाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश मिळवले आहे. विद्यालयाच्या ‘सेफ्टी रोड नेट’ या मॉडेलला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याने या मॉडेलची थेट राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

देवरुख येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नुकतेच हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. नववी ते बारावी या गटामध्ये झालेल्या स्पर्धेत निर्मला भिडे जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडेलने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. इयत्ता नववीतील विद्यार्थिनी सृष्टी संदीप कांबळे आणि श्रावणी प्रभाकर सावंत यांनी या मॉडेलची संकल्पना मांडून त्याची प्रभावी रचना केली.

या यशामागे मार्गदर्शक शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक अरुण कुराडे, अमल विद्यावर्धिनी संस्था व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य विद्यार्थ्यांना मिळाले. या यशामुळे कोंडये परिसरात आनंदाचे वातावरण असून, विद्यालयाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3366874
Share This Article