GRAMIN SEARCH BANNER

खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

Gramin Varta
129 Views

खेड: खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा २०२५ या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी भरणे येथील श्री काळकाई देवी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे होते, तर खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

या प्रकाशन सोहळ्यासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये उद्योजक सुरज जोगळे, माजी सभापती शांताराम चीनकटे, कुणबी समाजोन्नती संघ खेडचे अध्यक्ष कृष्णा आग्रे, बाळू सनगरे, बुरटे सर, रवींद्र रेवाळे, केंद्रप्रमुख विलास धामणे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक रवींद्र हरावडे आणि दत्ताराम हंबीर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे विधिवत प्रकाशन करण्यात आले.

हा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, कोषाध्यक्ष संतोष गांगरकर, उपाध्यक्ष प्रकाश कोदारे, नरेश ठोंबरे, निलेश कांदेकर, शरद कदम, प्रमोद म्हादे, सल्लागार विजय बाईत, विलास धामणे, तुकाराम काताळे, सहसचिव संदीप घाणेकर, राजेश भागणे, नवनीत घडशी, तालुका संपर्कप्रमुख संजय जाधव, भागोजी कडव, सचिन गावडे, मुख्य संघटक मनोहर मनवळ, संजय चांदिवडे, दीपक खाडे, प्रदीप घाणेकर, प्रसिद्धीप्रमुख शशिकांत भुवड यांच्यासह सुभाष आंबेडे, प्रवीण गीते, अंकुश भानसे, संदीप फागे, रवींद्र जोगळे, राजाराम फावरे, संतोष बुरटे, संतोष तांबट, अनंत शिंदे, चंद्रकांत रेवाळे, अनंत भागणे, महेश जाडे, प्रशांत आंबेडे आणि लक्ष्मण बाईत यांनी परिश्रम घेतले. तसेच महिला प्रतिनिधी ऋतुजा चांदिवडे, रसिका रेवाळे, मनीषा बैकर, सिद्धी जाधव, तृप्ती काताळे, ऋतुजा तांदळे, सनीरीता बाईत, विद्या घडशी, दर्शना शिगवण, अंकिता भागणे, सुमेधा फागे आणि स्नेहल गावणकर यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.

Total Visitor Counter

3370142
Share This Article