GRAMIN SEARCH BANNER

मुंबई मनपा निवडणुकीसाठी २,३४९ उमेदवारांचे अर्ज वैध

Gramin Varta
115 Views

मुंबई: सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यासाठी २,५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. निवडणूक आयोगाने केलेल्या छाननीत त्यातले १६७ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे अखेर २,३४९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान आज, २ जानेवारी रोजी नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. यात किती जण अर्ज मागे घेतात, तेही स्पष्ट होईल. त्यानंतर, शनिवार, 3 जानेवारी रोजी वैध उमेदवारांना निवडणूक चिन्‍हांचे वाटप करण्‍यात येणार आहे.

येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या असून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे.

Total Visitor Counter

3214205
Share This Article