GRAMIN SEARCH BANNER

शिर्के हायस्कूलसमोर रिक्षाची धडकेत ८ वर्षीय मुलगा जखमी

Gramin Varta
242 Views

रत्नागिरी : शहरातील शिर्के हायस्कूलसमोर रस्ता ओलांडत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला रिक्षाने धडक दिल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी रिक्षा चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश दत्ताराम मांडवकर (६३, रा. सुपलवाडी, रत्नागिरी) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ बीसी ०८०४) रस्ता ओलांडत असलेल्या रुद्र अवधूत आमकर (८) याला धडकली. या अपघातात रुद्र जखमी झाला. घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3374432
Share This Article