GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: शिक्षिकेची बदनामी केल्याच्या प्रकरणातील संशयिताला सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Gramin Varta
354 Views

संगमेश्वर:  तालुक्यातील एका शाळेतील शिक्षिकेचे चारित्रहनन करून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या एका संशयिताला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सुनील दौलत दळवी (रा. संगमेश्वर) असे या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणात सुनील दळवी यांच्यासह संदीप विष्णू नटे व संदीप जयवंत जाधव (रा. संगमेश्वर) या तिघांविरुद्ध संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यापैकी अन्य दोघांना यापूर्वीच जामीन देण्यात आला आहे. पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती शाळेत ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना शिकवते. संशयित सुनील दळवी व इतर दोघांनी शिक्षिकेचे एका विद्यार्थ्याशी प्रेमसंबंध असल्याची बदनामी समाजात केली. तसेच, ती त्याला लॉजमध्ये घेऊन गेली व औषधे दिली, ज्यामुळे तो आजारी पडला, अशी बदनामी समाजात केली, अशी तक्रार शिक्षिकेने संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५ (१)(४)(३), ७, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून होणाऱ्या अटकेच्या शक्यतेने सुनील दळवी याने सत्र न्यायालयापुढे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. सुनीलच्या वकिलांनी, गुन्ह्यांसाठी ठरवलेली शिक्षा ५ वर्षांपेक्षा जास्त नाही, तसेच तो चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे आणि इतर दोन सहआरोपींना जामीन मंजूर झाल्याचे कारण देत अर्ज मंजूर करण्याची विनंती केली. तर सरकार पक्ष आणि पीडितेने, आरोपी दबाव आणू शकतो आणि बदनामीकारक अफवा पसरवल्यामुळे अर्ज फेटाळण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने अर्जदाराने चौकशीत सहकार्य केले आहे आणि तपासाचा बहुतांश भाग पूर्ण झाल्यामुळे कोठडी आवश्यक वाटत नसल्याचे नमूद करून, आरोपी सुनील दळवीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Total Visitor Counter

3199305
Share This Article