GRAMIN SEARCH BANNER

आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण

Gramin Varta
21 Views

देवरुख: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील अनुभव देणे, तांत्रिक कौशल्यांचा विकास साधणे आणि रोजगारक्षमतेत वाढ घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयातील एम. एससी. व टी.वाय. बी.एस्सी.(रसायनशास्त्र) विभागाच्या विद्यार्थ्यांनी फायटो फार्मा लि., कोल्हापूर, गरुडा केमिकल, इक्सेल कंपनी, लोटे-परशुराम, चिपळूण या उद्योगांमध्ये १५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले.  

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना रासायनिक उद्योगातील प्रत्यक्ष कामकाज, विविध विभागांची कार्यपद्धती, औद्योगिक सुरक्षा नियम, आधुनिक विश्लेषणात्मक उपकरणांची हाताळणी तसेच उत्पादन आणि संशोधन प्रक्रियेची सखोल ओळख झाली. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सागर संकपाळ, डॉ. अमित वराळे, डॉ. हेमंत चव्हाण, प्रा. अजित देवळे, व प्रा. प्रज्ञा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी विविध रासायनिक विश्लेषणाकरिता आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांवर प्रशिक्षण घेतले. तसेच कंपनीच्या विविध विभागांमध्ये नमुना विश्लेषण, बॅच प्रक्रिया, कच्चा माल हाताळणी, फॉर्म्युलेशन विकास आणि सांडपाणी शुद्धीकरण यांसारख्या प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियांत सहभाग घेतला. आधुनिक औद्योगिक वातावरणात काम करण्याचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील करिअरसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्ये, व्यावसायिक दृष्टिकोन आणि रोजगारक्षमता यात लक्षणीय भर पडल्याने प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर  व सर्व मार्गदर्शक प्राध्यापकांनी समाधान व्यक्त केले.

Total Visitor Counter

3366997
Share This Article