रत्नागिरी : शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. टि.आर.पी. येथील शिवरेकर हाईट्स इमारतीच्या पार्किंगमधून एक होंडा शाईन (MH-48/Q/8063) मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ९ जुलै रोजी दुपारी २.१५ ते १० जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी प्रशांत प्रभाकर रसाळ (वय ३१, व्यवसाय – बँक एजंट, रा. रुम नंबर १०१, शिवरेकर हाईट्स, टि.आर.पी., रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. रसाळ यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल इमारतीखाली पार्किंगमध्ये लावली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.
रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.