संगमेश्वर : तालुक्यातील कोळंबे गावमळा येथे गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष प्रकाश मोहिते (वय ४२, रा. कुरधुंडा बौद्धवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. १० जुलै रोजी सायंकाळी ०६.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कोळंबे गावमळा येथील स्मशानभूमीजवळील भातशेतीच्या मळ्यात, बांधाच्या काठावर असलेल्या झाडाच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पो.कॉ. राहुल नामदेव खरपे यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात आशिष प्रकाश मोहिते हा त्याच्या ताब्यात ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि संबंधित साहित्य घेऊन मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून ८४०/- रुपये किमतीची गावठी दारू आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
आरोपी आशिष मोहिते विरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
संगमेश्वरमधील कोळंबे – गावमळा येथे गावठी दारूसह एकावर गुन्हा
