चिपळूण: शहरातील प्रतिथयश उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व कालभैरव भक्त सुनील रेडीज यांची चिपळूण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.यानिमित्ताने कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
रेडीज यांना श्री कालभैरव देवस्थानचा प्रसाद, महावस्त्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. ट्रस्टचे विश्वस्त समीर शेट्ये, पंकज कोळवणकर, मुकुंद वेल्हाळ, शुभम कारंडे, राकेश दाते, आबा कापडी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी रेडीज म्हणाले, “रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवून चिपळूण शहर व परिसरातील नागरिकांची सेवा करण्याचा माझा संकल्प आहे. या कार्यात सहकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा ठरेल.”
चिपळूण : रोटरी क्लब अध्यक्ष सुनील रेडीज यांचा कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार
