GRAMIN SEARCH BANNER

कृषी प्रदर्शनात वाशिष्टीच्या गोड पदार्थाच्या स्पर्धा उत्साहात

Gramin Varta
15 Views

ओमळीचा ओम ओंबळकर लक्षवेधी

चिपळूण l: चिपळूण सावरकर मैदानात सुरु असलेल्या कृषी व पशू प्रदर्शनात वाशिष्टीच्या गोड पदार्थाच्या स्पर्धा आज गुरुवारी उत्साहात संपन्न झाल्या. 27 महिलांनी या स्पर्धेत आपले नावीन्यपूर्ण पौस्टिक पदार्थ सादर केले. या स्पर्धेत ओमळीचा ओम अमोल ओंबळकर हा हरहुन्नरी स्पर्धक विशेष लक्षवेधी ठरला त्याचे वाशिष्ठिच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी सन्मान चिन्ह देऊन खास कौतुक केले.

गोड पदार्थाच्या स्पर्धेत 27 महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेसाठी एक तासाची वेळ होती. यामध्ये वाशिष्टी डेअरीचे मिल्क पदार्थ वापरून पदार्थ बनवायचे होते. स्पर्धेकांनी कंदमुळे खीर, काटेकणगाची खीर,गोल्डन सुजीडिलेट, कांद्याची बासुंदी, बासुंदी कलाकंद, आंब्याचे मोदक, बाजरीचे मोदक, नाचणीचे मोदक, बाजरीची खीर बिटचे मोदक असे विविध पौस्टिक पदार्थ तयार केले होते. या पदार्थाची चव, पौष्टीकता, नावीन्यता, मांडणी, स्वच्छता आदी बाबी परीक्षक अंजली केळकर व मीना पवार यांनी पहिल्या. सर्वच महिलांनी एका पेक्षा एक सरस पदार्थ बनविले होते. लवकरचा त्याचा निकाल जाहीर होईल. उद्या शुक्रवार दि. 9 जानेवारीला सकाळी तिखट पदार्थाच्या स्पर्धा होतील. आजच्या सर्व स्पर्धकांना सौ. स्वप्ना यादव यांनी सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

ओम ठरला लक्षवेधी

महिलांच्या पाककला स्पर्धा असतानाही ओमळी – गावाकरवाडी येथील मूळ रहिवासी असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कुल सती हायस्कुलच्या नववीत शिकणाऱ्या ओम अमोल ओंबळकर याने हट्टाने सहभाग घेतला. सौ. यादव मॅडम यांच्याशी सतत संपर्क साधून मला बक्षीस नको पण पदार्थ करायचा आहे सांगितले. त्याची काहीतरी करायची जिद्द व चिकाटी पाहून यादव मॅडमनी त्याला परवानगी दिली. त्याने बीटचे मोदक बनवून सर्वांचेच मन जिंकले. सर्वानी त्याचे भरभरून कौतुक केले. त्याच्या पदार्थाची स्तुती केली. स्वप्ना यादव मॅडमनी त्याला वाशिष्टीचे सन्मान चिन्ह देऊन त्याचा विशेष सत्कार केला व भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3375688
Share This Article