GRAMIN SEARCH BANNER

कडवईत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप आणि शिवाली परब यांचे ढोल-ताशांच्या गजरात उत्स्फूर्त स्वागत

Gramin Varta
417 Views

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘मनोरंजनातून ग्रामविकास’ कार्यक्रम संपन्न

संगमेश्वर/मिलिंद चव्हाण: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘मनोरंजनातून ग्रामविकास’ ही संकल्पना घेऊन संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे आलेल्या महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप आणि शिवाली परब यांचे ग्रामस्थांनी अभूतपूर्व स्वागत केले. कडवई गावाने या अभियानात सहभाग घेतला असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे आणि उपक्रम राबविले जात आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून प्रशासनाच्या वतीने या दोन लोकप्रिय कलाकारांनी कडवई गावाला भेट दिली. गावाच्या सीमेवर म्हणजेच तुरळ फाटा येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांचा गजर आणि लेझीम पथकाच्या तालावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पृथ्वीक आणि शिवाली यांनी स्वतः लेझीम खेळण्याचा आनंद लुटत उपस्थितांची मने जिंकली. यानंतर कडवई बाजारपेठ येथे महाराष्ट्र उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले, तर भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या स्काऊट गाईड पथकानेही या स्वागत सोहळ्यात सहभाग नोंदवला.

कार्यक्रमादरम्यान या कलाकारांनी कडवई गावाला या अभियानात उज्ज्वल यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याच प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कडवई ग्रामपंचायतीच्या सौरऊर्जेवरील पथदीप योजनेचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे यांच्यासह सरपंच विशाखा कुवळेकर, ग्रामधिकारी राहुलकुमार चौधरी, उपसरपंच दत्ताराम ओकटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संतोष थेराडे, जितेंद्र चव्हाण, राजेंद्र सुर्वे, राजन कापडी, वसंत उजगावकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Total Visitor Counter

3366983
Share This Article