GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे समीर तिवरेकर

Gramin Varta
211 Views

शिंदे सेनेकडून अभिजीत दुडये, प्रदीप उर्फ बंड्या साळवी, तर भाजपकडून संदीप उर्फ बाबू सुर्वे स्वीकृत नगरसेवक

रत्नागिरी : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने (शिवसेना–भाजप) स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केल्यानंतर सोमवारी उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समीर तिवरेकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. महायुतीच्या नेत्यांमध्ये आधीच तिवरेकर यांच्या नावावर एकमत झाल्याने ही प्रक्रिया शांततेत व कोणत्याही वादाविना पूर्ण झाली.

याच बैठकीत नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकांचीही निवड करण्यात आली. शिवसेना (शिंदे गट) कडून अभिजीत दुडये आणि प्रदीप उर्फ बंड्या साळवी, तर भाजपकडून संदीप उर्फ बाबू सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. निवडीनंतर नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या निवडीमुळे नगरपरिषदेत महायुतीची प्रशासकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे

Total Visitor Counter

3386924
Share This Article