GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : विषारी औषध प्राशनामुळे आंबव येथील प्रौढाचा मृत्यू

Gramin Varta
148 Views

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव कोंडकदमराव घाटेवाडी येथे ५५ वर्षीय व्यक्तीचा विषारी औषध प्राशनामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. राजाराम सिताराम घाटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी वसंत सिताराम घाटे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी घाटे बंधू शेतातील काम आटोपून घरी परतले होते. त्यानंतर राजाराम घाटे हे घराबाहेरील बाथरूममध्ये गेले आणि तेथून अंगणात येऊन बसले. काही वेळातच त्यांना अचानक उलट्या सुरू झाल्या. यावेळी घरातील सदस्यांनी विचारणा केली असता, त्यांनी चुकून गोचीड मारण्याचे विषारी औषध दारू समजून प्राशन केल्याचे सांगितले.

त्यानंतर त्यांना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने दुपारी सुमारे १.३० वाजता त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती राजाराम घाटे यांना मृत घोषित केले.

Total Visitor Counter

3352760
Share This Article