GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात डंपर-दुचाकी अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Gramin Varta
139 Views

चिपळूण : तालुक्यातील वालोटी फाटा येथे डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव सुरेश गोरिवले (वय 50) असे आहे.

सुरेश गोरिवले हे आपल्या दुचाकीवरून चिपळूणच्या दिशेने जात असताना वालोटी फाटा परिसरात समोरून येणाऱ्या डंपरशी त्यांचा अपघात झाला. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात झालेली नसल्याने अपघाताबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

Total Visitor Counter

3387169
Share This Article