GRAMIN SEARCH BANNER

उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे धावणार ‘समर स्पेशल’ साप्ताहिक गाडी

Gramin Varta
11 Views

रत्नागिरी: उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी ओळखून कोकण रेल्वे प्रशासनाने मडगाव ते पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने १३ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्रमांक ०११०६ मडगाव – पनवेल विशेष साप्ताहिक गाडी रविवारी १७ मे रोजी दुपारी १६:३० वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता पनवेलला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११०५ पनवेल – मडगाव विशेष साप्ताहिक गाडी सोमवार १८ मे रोजी सकाळी ०५:४५ वाजता पनवेल येथून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी १८:१० वाजता मडगावला पोहोचेल.

या विशेष गाडीला प्रवाशांच्या सोयीसाठी करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. एकूण २३ डब्यांच्या या गाडीमध्ये ३ टायर एसीचे ३ कोच, ११ स्लीपर कोच, ७ जनरल कोच आणि २ एसएलआर डब्यांचा समावेश असेल. या गाडीचे आरक्षण १४ मे २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर, इंटरनेट आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3380363
Share This Article