GRAMIN SEARCH BANNER

पाग स्टार क्रिकेट क्लब आयोजित पाग प्रीमियर लीग ‘उघडा मारुती चषक’ स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात

Gramin Varta
62 Views

चिपळूण : चिपळूण शहरातील पाग स्टार क्रिकेट क्लब आयोजित पाग प्रीमियर लीग – उघडा मारुती चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते शनिवारी सकाळी उत्साहात संपन्न झाले.

ही मानाची स्पर्धा गेले अनेक वर्षे सातत्याने आयोजित केली जात असून यंदाही दोन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या वेळी आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक गणेश आग्रे, ज्येष्ठ नागरिक सुरेश काते, अनिकेत सावंत, मनोज जाधव, अरविंद शेलार, महेश शिंदे, तसेच प्रमुख आयोजक संदेश गोरीवले, संदेश किंजळकर, शालिनी तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष महेश शिंदे, उपाध्यक्ष आयुष गोरीवले, कार्याध्यक्ष संदेश गोरीवले, कुणाल सावंत, स्वप्निल नाचणकर, ऋषभ तांबडे यांच्यासह पाग स्टार क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.

या स्पर्धेमुळे परिसरातील खेळाडूंना व्यासपीठ मिळत असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

Total Visitor Counter

3073097
Share This Article