रत्नागिरी : १२ वी परीक्षेनंतर घरी परतणाऱ्या तरुणीचा बसमध्ये पाठलाग; तरुण ताब्यात

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी : शनिवारी दुपारी सुमारे २.१० वाजण्याच्या सुमारास १२ वी बोर्डची परीक्षा दिल्यानंतर घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला. रत्नागिरी येथील रत्नागिरी बस स्थानक येथून बसने प्रवास सुरू असताना, सिव्हिल हॉस्पिटल बस स्टॉपवर एक इसम बसमध्ये चढला. त्याने तरुणीचा पाठलाग करत तिच्या शेजारी आसन घेतले आणि तिच्या संमतीशिवाय मोबाईलद्वारे छुप्या पद्धतीने छायाचित्रे काढल्याचे निष्पन्न झाले.

प्रकरणाची माहिती मिळताच नितीन बगाटे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पीडित तरुणीशी संवाद साधला व घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलिसांनी तत्पर कारवाई करत संशयित आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले.

या घटनेप्रकरणी संबंधित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७८(१) व ७९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *