ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनात आज डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

चिपळूण:ग्रामीण, कृषी आणि सहकार या विषयांवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या विशेष साहित्य संमेलनामध्ये आज, रविवारी १५ फेब्रुवारी रोजी महत्त्वपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत हे आजच्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. ही मुलाखत सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत पार पडणार असून ‘दैनिक सकाळ’चे माजी संपादक यमाजी मालकर हे डॉ. चोरगे यांच्याशी संवाद साधणार आहेत. या मुलाखतीतून शेती, ग्रामीण जीवन आणि सहकार क्षेत्रातील डॉ. चोरगे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि विचार ऐकण्याची सुवर्णसंधी उपस्थितांना मिळणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने दिवसभरात विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले असून ज्येष्ठ साहित्यिक आपले विचार मांडणार आहेत. शेती आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि रसिकांनी सकाळी ९.०० वाजल्यापासून या संमेलनास उपस्थित राहून या बौद्धिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *