‘हिंद की चादर’ गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम शताब्दी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

चिपळूण नगर परिषदेत आरोग्य तपासणी शिबिर

चिपळूण : ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून प्रभात फेरी, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांचा शुभारंभ सोमवारी नागरिक व कर्मचारी आरोग्य तपासणी शिबिराने करण्यात आला.

चिपळूण नगर परिषदेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते झाले. हे शिबिर अपरांत हॉस्पिटल व चिपळूण नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

या वेळी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांनी गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीही शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा देत सर्व उपक्रमांना नगर परिषदेचे पूर्ण सहकार्य राहील, असे स्पष्ट केले.

या कार्यक्रमास मुख्याधिकारी संजय जाधव, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका वैशाली निमकर, वैशाली कदम, शिल्पा देसाई, शीतल रानडे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहित खाडे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. प्राची हरवंदे, डॉ. स्नेहल नागरे, डॉ. शंतनू गोरे, डॉ. रूपा गरुड, डॉ. मयेकर व डॉ. भक्ती पालांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *