चिपळुणात बस – कार अपघातप्रकरणी कार चालकावर गुन्हा

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

चिपळूण : एस.टी. बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातप्रकरणी कार चालकावर गुरुवारी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश गोपिनाथ राजेशिर्के (वय 43, रा. चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे.

याबाबतची फिर्याद पांडुरंग शिवाजी पाटील (चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश राजेशिर्के यांनी गोवा–मुंबई महामार्गावरील रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता कार भरधाव वेगात चालवली. याच दरम्यान त्यांच्या कारने एस.टी. बसला धडक दिली.

या अपघातात एस.टी. बस आणि कार या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *