रत्नागिरी मावळंगे येथे झाडावरून पडल्याने नेपाळी कामगार जखमी

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: तालुक्यातील मावळंगे येथे झाडावरून पडून एक नेपाळी कामगार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. चक्रबहाद्दूर लक्ष्मण गिरी (वय 50, रा. चिंचखरी, रत्नागिरी; मूळ रा. नेपाळ) असे जखमी कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हापूस आंब्याची मोहोर आलेली कलमांची फांदी हलवित असताना तोल गेल्याने चक्रबहाद्दूर गिरी झाडावरून खाली पडले आणि त्यात ते जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *