लांजा: खेरवसे येथून ८,७०० रुपयांच्या साहित्याची चोरी

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

लांजा: तालुक्यातील खेरवसे येथे एका जमिनीच्या विहिरीवरील पाण्याचा पंप आणि शेतीचे साहित्य मिळून एकूण ८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी कुलदीप नामदेव गायकवाड (वय ४०, रा. माऊलीनगर-लांजा, मूळ रा. नांदेड) हे लांजा येथे महसूल विभागात कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या ड्युटीनंतर ते आपल्या मूळ गावी गेले होते. गायकवाड घरी नसल्याची संधी साधून चोरट्याने २३ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२५ या दरम्यान ही चोरी केली.

गायकवाड यांची खेरवसे येथे जमीन असून तेथील विहिरीवर ठेवलेले खालील साहित्य चोरीला गेले आहे.होंडा कंपनीचा पेट्रोल पंप: किंमत ८,००० रुपये.फवारणीचे औषध ज्याची  किंमत ४०० रुपये.२ लिटर पेट्रोल आणि ५०० मिली ऑईल.असा एकूण मुद्देमाल ८,७०० रुपये.

गायकवाड यांनी नांदेडहून परतल्यानंतर ही तक्रार दाखल केली आहे.लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *