GRAMIN SEARCH BANNER

लांजा परिसरात दुचाकी घसरून महिलेचा मृत्यू

Overturned motorcycle and helmet on the street after collision with the car

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा कुंभारवाडी येथील निरंकारी सत्संग मठाजवळ २३ जानेवारी रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास झालेल्या एका दुचाकी अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून २ मार्च रोजी या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन शिवाजी मदने (वय ३२, रा. मिरज, सध्या रा. कोट, लांजा) यांचा भाऊ आरोपी संतोष शिवाजी मदने हा आपली प्लॅटीना दुचाकी (क्रमांक एम.एच. १० ई.यु. ७२८२) वरून वहिनी सविता सचिन मदने आणि त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन कोट येथून लांजाच्या दिशेने जात होता. कुंभारवाडी येथील निरंकारी सत्संग मठाच्या मागील बाजूस असलेल्या उतारावर आणि रस्ता कामासाठी करण्यात आलेल्या डायव्हर्जनजवळ ही घटना घडली. रस्त्यावर टाकलेल्या खडीवरून भरधाव वेगात असलेली दुचाकी चालकाचा ताबा सुटल्याने घसरली. या अपघातात मागे बसलेल्या सविता मदने यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने तीन वर्षांचा बालक या अपघातातून बचावला आहे.

या प्रकरणी लांजा पोलिसांनी आरोपी चालक संतोष मदने याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१, १२५(अ)(ब), १०६(१) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3367463
Share This Article