GRAMIN SEARCH BANNER

श्रीलंका किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर हल्ला; ८० जणांचा मृत्यू, १०१ जण बेपत्ता

Gramin Varta
150 Views

कोलंबो: हिंदी महासागरातील व्यापारी मार्गांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्हश्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुधवारी समुद्रात एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कथित पाणबुडी हल्ल्यानंतर एका इराणी जहाजावरील 101 जण बेपत्ता झाले असून ८० जण मृत्यूमुखी झाले आहेत.श्रीलंकेच्या नौदल आणि संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ही घटना बुधवारी श्रीलंकेच्या किनारी जलक्षेत्रात घडली. जहाजाकडून आपत्कालीन संदेश पाठविल्यानंतर श्रीलंकन नौदलाने मोठ्या प्रमाणावर शोध व बचाव मोहीम सुरू केली. नौदलाने अनेक जण जखमी झाल्याची आणि मोठ्या संख्येने लोक अद्याप बेपत्ता असल्याची पुष्टी केली आहे.संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, इराणी जहाजाकडून आपत्कालीन सिग्नल मिळताच श्रीलंकन नौदलाने तत्काळ बचावकार्यासाठी आपली जहाजे रवाना केली. प्रवक्त्याने हेही स्पष्ट केले की नौदलाने 32 जखमींना सुरक्षित बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी जखमींची जी संख्या सांगण्यात आली होती, त्यामध्ये आता दुरुस्ती करण्यात आली आहे.श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिता हेराथ यांनी यापूर्वी संसद सदस्यांना माहिती देताना सांगितले होते की बुडणाऱ्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना उपचारासाठी किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. मात्र, त्यांनी बचाव मोहिमेबाबत अधिक तपशील दिला नाही. त्यांनी असेही म्हटले की, या घटनेबाबत श्रीलंका योग्य ती पावले उचलेल. सध्या जहाजाची ओळख, त्यावर एकूण किती लोक होते आणि कथित पाणबुडी हल्ल्यासाठी जबाबदार कोण आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पुढील माहितीसाठी श्रीलंकन संरक्षण अधिकारी आणि इराणी अधिकाऱ्यांकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा केली जात आहे.

Total Visitor Counter

3366860
Share This Article