GRAMIN SEARCH BANNER

खेड रोहिदास समाजाचे सक्रिय पदाधिकारी भार्गव नांदगावकर यांचे निधन

खेड : तालुका रोहिदास समाज सेवा संघ अंतर्गत तालुक्यातील नांदगाव विभागप्रमुख भार्गव बाळू नांदगावकर (७७) यांचे ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. गेली १० वर्षहून अधिक ते संघाच्या खाडीपट्टा विभागाची जबाबदारी सांभाळत खाडीपट्ट्यातील समाजबांधवांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी धावून जाण्यासह तक्रारींचे निवारण करण्यात त्यांचा पुढाकार होता. समाजात ते तात्या म्हणून सुपरिचित होते.सायंकाळी नजीकच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर रोहिदास समाजसेवा संघ ता. खेड अध्यक्ष दिनेश शिरीषकर यांनी शोक व्यक्त केला असून आमचा सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता आम्ही गमावला आहे. समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

Total Visitor Counter

3488047
Share This Article