GRAMIN SEARCH BANNER

नाटे येथे घरफोडी; सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास

Gramin Varta
260 Views

राजापूर: तालुक्यातील नाटे येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ९१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख रुपये रोख, असा एकूण ३ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ४ मार्च रोजी दुपारी १२ ते ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोशन मोठाभाऊ बच्छाव (वय २७, रा. चिंचवड, ता. मालेगाव, जि. नाशिक) हे सध्या नाटे येथील यश होम स्टेच्या पाठीमागे विलास शहाणे यांच्या घरात भाड्याने राहतात.

ते एका कंपनीत प्रोजेक्ट सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच रोशन बच्छाव यांनी ६ मार्च रोजी नाटे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३) (४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3367001
Share This Article