GRAMIN SEARCH BANNER

लांजा देवधे गोंधळीवाडी येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
191 Views
suicide concept. noose with shadow on dark wall background

लांजा : तालुक्यातील देवधे गोंधळीवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिप्रमाणात मद्यपान करण्याच्या सवयीतून आलेल्या नशेत हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काशीराम ढाक गोंधळी (वय ६५, रा. देवधे गोंधळीवाडी, ता. लांजा) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

काशीराम यांना गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात दारू पिण्याची सवय होती. ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते दारूच्या नशेत असताना त्यांनी राहत्या घरातील खोलीच्या लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्यात रात्री १० वाजून २१ मिनिटांनी या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. एका वृद्धाने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने देवधे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3342065
Share This Article