चिपळूण: कळंबस्ते येथे ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’चे आज उद्घाटन

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

चिपळूण: महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून कळंबस्ते (ता. चिपळूण) येथे उभारण्यात आलेल्या ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ या प्रकल्पाचे उद्घाटन आज, दि.१४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.हा प्रकल्प आरजीपीपीएल (RGPPL) व नेरोलॅक (NEROLAC) यांच्या प्रायोजकत्वातून साकारण्यात आला आहे.

उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.या सोहळ्याला खासदार-आमदार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम कळंबस्ते (रेल्वे फाटकाजवळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे पार पडणार असून, या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सह्याद्री निसर्ग मित्रचे संचालक भाऊ काटदरे, उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे आणि तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *