पुर्णगड येथे मधमाशांच्या हल्ल्यात एकजण जखमी

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: तालुक्यातील पुर्णगड येथे कर्तव्यावर जात असताना मधमाशांच्या थव्याने केलेल्या हल्ल्यात एक प्रौढ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. प्रदीप रविकांत कामतेकर (वय ४०, रा. पुर्णगड) असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप कामतेकर हे पुर्णगड येथील एका सोसायटीमध्ये कामाला आहेत. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघाले होते. प्रवास करत असताना अचानक मधमाशांच्या एका मोठ्या घोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यात प्रदीप यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून तिथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली आहे@gramin-search

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *