GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडमध्ये गुरांच्या गोठ्याला आग, अग्निशमन दलाची तत्पर कारवाई

Gramin Varta
133 Views

मंडणगड : तालुक्यातील चिंचघर येथील प्रभूवाडी परिसरात रविवारी (१५ मार्च) सायंकाळी सुमारे ७:०५ वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी तात्काळ माहिती दिल्यानंतर खेड अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाने तातडीने बचाव व आग विझविण्याचे काम सुरू केले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत गोठ्यातील साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

या मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणव घाग आणि सुरेश शिगवण यांनी सहभाग घेतला. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली.

अग्निशमन दलाने मध्यरात्रीपर्यंत आग विझविण्याचे काम पूर्ण केले आणि पथक रात्री सुमारे १:०० वाजता अग्निशमन केंद्रात परतले. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले.

Total Visitor Counter

3344367
Share This Article